संगमेश्वर बस स्थानकानजिकच्या डोंगर, डबर उत्खनन शासनाकडून चौकशी होण्याची मागणी.
संगमेश्वर एसटी बस स्थानकानजिक असलेल्या मारूती मंदिर जवळच्या डोंगर उत्खनन ब्रेकर लावून काळा दगड फोडण्याचे काम महिनाभर सुरू आहे. डोंगर, डबर उत्खननासाठी खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी श्री. पासवान या व्यक्तीने विनापरवाना डोंगर उत्खनन करून माती नदीत टाकली होती. वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यानंतर खातेनिहाय चौकशी करून पासवान यांना महसूल यंत्रणेने दोन कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. पुन्हा याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगर उत्खननाचे काम सुरू आहे.www.konkantoday.com