
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथील मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे बॅनर हटवल्याने रत्नागिरी शहरातून संताप
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथील मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे बॅनर हटवल्याने रत्नागिरी शहरातून संताप व्यक्त केला जात असून भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी गुरूवारी रात्री शहर पोलीस स्थानकात जमले होते.त्या फलकाची विटंबना केली असावी असा संशय व्यक्त करत आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे तर पुन्हा हा बॅनर लावण्याचे ठरविण्यात आले आहे.रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामुळे एका दिवसात काढण्यात आल्याने रत्नागिरीकरानी याचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. ना. नितेश राणे यांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी शहरात मंगळवार पासून भलेमोठे बॅनर झळकवण्यात आले होते.मात्र यातील पेठकिल्ला येथे उभारलेल्या बॅनर समाजकंटकाने हटविला असा संशय भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आहे. एका रात्रीत हा बॅनर काढल्याने त्याची विटंबना केली असल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे.याचा सखोल तपास होऊन आरोपींवर कायदेशीर करावी असे निवेदन भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी शहर पोलीस निरीक्षक श्री. शिवरकर याना दिले आहे.दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्व भाजपा कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी भुते नाका येथे जमणार असून बॅनर पुन्हा लावणार आहेत.