
Cognizant महाराष्ट्रात त्यांचा विस्तार करण्यासाठी उत्सुक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांची यशस्वी चर्चा.
दावोस येथेCognizant चे सीईओ श्री. रवी कुमार एस. यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्रात नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे Cognizant च्या कार्यालयांच्या विस्तारासह मेडिसिटी, स्पोर्टसिटी आणि परदेशी विद्यापीठांसाठी महाराष्ट्राचा गेटवे म्हणून वापर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
फिनटेकसह इतर क्षेत्रांमध्ये विस्तारावर भर देण्यात आला, Cognizant महाराष्ट्रात त्यांचा विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचे सीईओंनी नमूद केले.