
रत्नागिरी शहरानजिक खेडशी येथे गोवंश अवशेषांची होणार फॉरेन्सिक तपासणी.
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथे आढळूनआलेल्या गोवंशाच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अहवालातून गोवंशाचा मृत्यू कशामुळे झाला, या विषयीची तपासणी करण्यात . येणार आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात येत आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.याप्रकरणी विशाल पटेल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, – ३२५, २३८ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५अ, ५ब आणि ९. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करुन तपास केला जात असल्याचे सांगितले.www.konkantoday.com