खेड तालुक्यातील खोपी गावातील ८० वर्षीय वृद्धेची फसवणूक
खेड तालुक्यातील खोपी गावातील शेनवाडी येथील राहणार्या ८० वृद्धेचे सासर आहे. आम्ही तुझी पेन्शन सुरू करून देतो म्हणून कोंडीवली येथील माहेरहून आलेले गणेश दामू शिंदे, धोंडू केशव खोचरे या दोघांनी एका कोर्या कागदावर जबरदस्तीने अंगावरील दागिने घेवून माझी फसवणूक करणार्या ठेकेदाराविरूद्ध येथील पोलिसांत कायदेशीर लेखी स्वरूपात तक्रार करूनही, येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी साधी दखल न घेता कोणतीच कायदेशीर कारवाई केलेली नाही.
याची दखल गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी आणि प्रभारी डिवायएसपी राजमाने यांनी घेवून का कारवाई केली नाही, असा जाब विचारून वर नमूद ठकसेनाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी श्रीमती पार्वती शंकर पवार यांनी केली. ही घटना रविवार दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी दुपारच्या वेळेस घडली. या तक्रारीची गंभीर दखल घेवून माझ्यासारख्या वृद्धेला न्याय द्यावा, अशी आशा व्यक्त केली आहे.www.konkantoday.com