मच्छिमार जेटींवरील अतिक्रमणे तत्काळ हटवा, दर्यावर्दी हिंदू मच्छिमार संघटनेची मागणी.
रत्नागिरीतील महत्वाच्या मच्छिमार जेटीवर ठरावक मांडणी, अतिक्रमण करून पारंपारिक मच्छिमारांना व्यवसाय करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अशी अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी दर्यावर्दी हिंदू मच्छिमार संघटना, रत्नागिरी या पारंपारिक मच्छिमार संघटनेने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले असून त्यात म्हटल्याप्रमाणे, रत्नागिरीतील हिंदू समाजातील पारंपारिक मच्छीमार आहोत.
आम्ही पारंपारिक पद्धतीने पकडलेले मासे, माशांच्या साठवणुकीसाठी लागणारे बर्फ आदी साहित्यांसाठी आमच्या रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर नेहमी ये-जा सुरू असते. मिकरवाडा जेटी रत्नागिरीतील मच्छिमारांसाठी तसेच नौकेवरील आवश्यक/साहित्य ये-जा करण्यासाठी शासनाने बांधलेली आहे. मिरकरवाडा जेटी व त्यांच्या सभोवतालचा परिसर हा मत्स्य विभाग कार्यालयाच्या अखत्यारित येतो. मात्र मागील काही वर्षापासून मिरकरवाडा जेटीवर व त्यांच्या सभोवतालच्या परिसरावर अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे.www.konkantoday.com