
येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या :- आमदार किरण सामंत
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली येथे संपन्न झाली नियोजनाची बैठक

रत्नागिरी
दि.११ ऑगस्ट
लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येणाऱ्या गणपतीच्या उत्सवाच्या अनुषंगाने चाकरमानांना कोणताही वाहतुकीचा किंवा अन्य कोणत्याही विषयाचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी एस. टी.रिक्षा, वडाप,व्यापारी, अशा विविध संघटनांची बैठक लावण्यात आली होती.या बैठकीला संबंधित विभागाचे सर्वाधिकारी उपस्थित होते.
यावेळेस येणाऱ्या मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये याची जबाबदारी आपली असून त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्या पद्धतीने सहकार्य करण्याचे आदेश आमदार किरण सामंत यांनी यावेळेस दिले. स्थानिक लोकांनी यावेळी प्रशासनाला सहकार्य करून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना या वेळेस दिल्या. या कार्यक्रमाला रत्नागिरीचे प्रांत अधिकारी जीवन देसाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, प्रादेशिक परिवहनचे पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्री. कुलकर्णी, कौशिक रहाटे, अनिल सिंग, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




