
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी जवळ शुकनदीच्या पुलावरून ७० फुट खोल नदीत कार कोसळली, सुदैवाने कारमधील पाचही जण बचावले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी जवळ शुकनदीच्या पुलावरून ७० फुट खोल नदीत कार कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. सुदैवाने या अपघातात कारमधील पाचही जण बचावले असुन दोघेजण जखमी आहेत.
.मुंबईहुन गोव्याकडे निघालेली एक कार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एडगाव येथे आली. वैभववाडीच्या दिशेने येत असताना शुकनदीच्या पुलावरून कार कोसळली. ७० फुट खोल नदीत पात्रात जावुन कार थांबली. या अपघाताची माहीती मिळताच तेथे लोकांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेत कारमधील सर्वांना सुरक्षित बाहेर काढलेअपघातादरम्यान कारमध्ये एकुण पाचजण होते. त्यापैकी दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले.
www.konkantoday.com