
मंडणगड-भिंगळोली येथे काळविटाची शिंगे हस्तगत, एकजण पोलिसांच्या ताब्यात
मडणगड पोलीस ठाणे व गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या कारवाईत मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथे ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास भिंगळोली येथील हॉटेल शिवप्रसादसमोर राष्ट्रीय महामार्गावर काळवीटाची शिंगे पोलीस पथकाने हस्तगत केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित इसम शामराव धोंडीराम देवकर (५०, रा. इंद्रनगर झोपडपट्टी वैरागी तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस गस्तीवर असताना भिंगळोली येथे संशयितरित्या उभा असलेल्या एकास पोलिसांनी विचारणा रेली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत हरण प्रजातीतील प्राण्याची ६ शिंगे आढळली.
www.konkantoday.com