
राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु.
रत्नागिरी, दि. 17 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु करण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत.* प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासंबंधी माहितीकरीता आर.डी. जानवेकर 8779774693 या क्रमांकावर सपंर्क साधावा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे कॉस्मेटॉलॉजी, फ्रूटस अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स हे व्यवसाय शिकविले जातात. व्यवसायाची प्रवेश क्षमता अनुक्रमे कॉस्मेटोलॉजी-24. फ्रूटस अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग 24, ड्रेस मेकिंग 20, स्युइंग टेक्नॉलॉजी -20, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट – 24, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स 24 आहे. ड्रेस मेकिंग, स्युइंग टेक्नॉलॉजी करीता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण आहे व इतर सर्व व्यवसायांकरीता दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स या व्यवसायाकरीता 2 वर्षांचा कालावधी आहे व इतर सर्व व्यवसायाकरीता एक वर्षाचा कालावधी आहे.अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते. आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतन वाढ करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आली आहे.
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वंयरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) यांनी केले आहे