
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत ,सिंधुदुर्गचे नितेश राणे तर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे.
राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाले.रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत ,सिंधुदुर्गचे नितेश राणे तर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचे नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु त्यांना मोठा विरोध होत होता. यामुळे आता अजित पवार बीडचे पालकत्व सांभाळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे.
गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच दोन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळेठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणेअमरावती – चंद्रशेखर बावनकुळेअहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटीलवाशिम – हसन मुश्रीफसांगली – चंद्रकांत पाटीलसातारा -शंभुराजे देसाईछत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाटजळगाव – गुलाबराव पाटीलयवतमाळ – संजय राठोडकोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळअकोला – आकाश फुंडकरभंडारा – संजय सावकारेबुलढाणा – मंकरंद जाधवचंद्रपूर – अशोक ऊईकेधाराशीव – प्रताप सरनाईकधुळे – जयकुमार रावलगोंदिया – बाबासाहेब पाटीलहिंगोली – नरहरी झिरवळलातूर – शिवेंद्रसिंग भोसलेमुंबई शहर – एकनाथ शिंदेमुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढानांदेड – अतुल सावेनंदुरबार – मानिकराव कोकाटेनाशिक – गिरीश महाजनपालघर – गणेश नाईकपरभणी – मेघना बोर्डीकररायगड – अदिती तटकरेसिंधुदुर्ग- नितेश राणेरत्नागिरी – उदय सामंतसोलापूर – जयकुमार गोरेवर्धा – पंकज भोयरजालना – पंकजा मुंडे