
तर मी ठाण्यातून निवडणूक लढवेन-आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना आधीच वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्यात हिंमत नसेल तर मी ठाण्यातून निवडणूक लढवेन, असं आदित्य म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिलेले होते. त्यांची हिंमत नसेल तर मी ठाण्यातून निवडणूक लढवेन, असं आदित्य म्हणाले.
मी महाराष्ट्राच्या घरात चाललो आहे. दिल्ली आणि गुजरातच्या घरात चाललो नाही, अशा शब्दांत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर दिले. महिला आरक्षण विधेयकावरही त्यांनी भाष्य केले. आमचं महिला आरक्षण विधेयकाला समर्थन आहे. पण हे विधेयक म्हणजे निवडणुकीपुरता जुमला आहे, असे ते म्हणाले.आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग तळगाव येथे विनायक राऊत यांच्या निवासस्थानी आले होते. राऊतांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी ते टाळ हाती घेऊन भजनी मंडळाला साथसंगत केली.
www.konkantoday.com