
सिंधुदुर्ग: ATS ने कणकवली स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना पकडले.
कणकवली रेल्वे स्थानकावर १५ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता सिंधुदुर्ग एटीएसच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. पकडलेल्या महिलांची नावे अतुल माझी (वय ३२, सध्या रा.कल्याण ईस्ट, मुंबई, मूळ रा. लेबु खाली, ता. डोगरी, जिल्हा ढाका, बांगलादेश) आणि लिझा रहीम शेख (वय २८, सध्या रा. बी-विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर, पुणे, मूळ रा. ढाका, बांगलादेश) अशी आहेत.
एटीएस पथकाला दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट किंवा कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय कणकवलीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, एटीएस पथक मध्यरात्री ३ वाजल्यापासून कणकवलीत तैनात होते. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी कणकवली रेल्वे स्थानकावर दबा धरला. पहाटे साडेपाच वाजता त्या महिलांना पकडण्यात आले.