केळवत घाटात वणव्याने नुकसान

मंडणगड : तालुक्यातील मंडणगड – खेड मार्गावरील केळवत घाटात दि. 15 रोजी दुपारच्या वेळेस अचानक लागलेल्या वणव्याने जवळपास एक ते दीड किलोमीटर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली. या वणव्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबर डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. कारवाई होत नसल्याने दरवर्षी वणव्यात वनसंपदा जळून खाक होत असल्याने नुकसान होते. या डोंगरांवर लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी लावलेली झाडे, औषधी वनस्पती, लहान पक्षी, प्राणी पडतात. आंबा, काजू तसेच रानमेव्याची मोहरलेली झाडे होरपळली जात असल्याने आर्थिक फटका बसून मोठे नुकसान होते. पंचनामे होतात पण नुकसान भरपाई मिळत नाही. दरवर्षी वणवा लागत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावली जाते की अचानक लागते? याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button