ज्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यांना याबाबत काही कळणारच नाही- माजी खासदार विनायक राऊत शिंदे गटावर भडकले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटविण्यात यावे, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे, त्यावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाची अक्कलच काढली आहे.ज्यांची अक्कल गुडघ्यात असते. त्यांना याबाबत काही कळणारच नाही, असा टोला लगावून ‘मुळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे नाहीत’, असा दावाही माजी खासदार राऊत यांनी केला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटविण्याचा ठराव शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. तो ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यावरून माजी खासदार विनायक राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.विनायक राऊत म्हणाले, मुळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे नाहीतच, त्यामुळे जे नाही त्यावर आकांडतांडव करणारी औलाद शिंदेंच्या गटात आहे. त्यांची ही बकवासगिरी नेहमी चालू असते, त्याला आम्ही जादा किंमत देत नाही.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले, त्यामुळे त्यांना हटवण्यात यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्यासारखे गद्दार झालो नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षच नाहीत, त्यामुळे टेक्निकलचासुद्धा विषय या ठिकाणी येत नाही, असा दावाही विनायक राऊतांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button