
चिपळूण शहरातील भोगाळे येथे अपघातात जखमी महिलेचा मृत्यू.
चिपळूण शहरातील भोगाळे येथे काही दिवसांपूर्वी दुचाकीचा विचित्र अपघात झाला होता. यात गंभीररित्या जखमी असलेल्या महिलेवर कराड येथे उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. अंजली संजीव दाभाडे (४०, खेर्डी) असे निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील भोगाळे येथे सायंकाळी दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यात अंजली दाभाडे या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. तेथील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील आदित्य मोटार ड्रायव्हींग स्कूलचे मालक संजीव दाभाडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्या बचत गटाच्या सीआरपी देखील होत्या. त्या महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देखील देत असत. शनिवारी रात्री त्यांच्यावर खेर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.www.konkantoday.com