
मंडणगड तालुक्यातील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
मंडणगड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व मंडणगड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात खासदार सुनील तटकरे व मौलाना अबुल कलाम आझाद अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्षप्रवेश झाला. श्री. मिरकर हे २००९ सालापासून तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तालुका समन्वय समिती अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना तालुका समिती अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य अशा विविध शासकीय समित्यांच्या जबाबदार्या सांभाळणार्या सौ. मिरकर यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल तालुक्यात विशेष आकर्षण आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून समविचारी पक्षात त्यांनी केलेला पक्ष प्रवेश आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याचे संकेत मिळत असताना त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीस तालुक्यासह मतदार संघात मोठे बळ मिळणार आहे.www.konkantoday.com




