सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधले

हर हर महादेवाचा गजर ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चार आणि हजारो भाविकांची उपस्थितीत बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणारे श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण करण्यात आले.यासाठी 11 राजस्थानी कारागीर वीस ते पंचवीस स्थानिक मदतनीस चार जेसीबी याच्या साह्याने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधण्याचा निश्चय गोव्यातील एका उद्योजकांकडून करण्यात आला होता. त्याने आपले मत सरमळे वासियाकडे बोलून दाखवले होते. सरमळे वासियानी हे काम मनावर घेतले आणि देवाच्या सर्व रूढी परंपरा पूर्ण करून हे मंदिर एका रात्रीत बांधण्याचे निश्चित केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button