सीआरझेडच्या परवानगीमुळे समुद्रकिनारा संरक्षण २५ बंधारे रखडले.

जिल्ह्यात पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या भगवती बंदर येथील सुमारे ३०२ कोटींचे क्रुझ टर्मिनल सीआरझेडच्या परवानगीमुळे रखडले आहे. त्यात भर म्हणून जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून सुमारे पावणे २०० कोटींच्या निधीतून होणारी २५ बंधार्‍यांची मंजूर कामे सीआरझेड परवानगीत खोळंबली आहेत.आपत्ती निवारण योजनेतून जिल्ह्यातील बंधार्‍यांची ही सर्व कामे हैद्राबादच्या कंपनीला देण्यात आली आहेत.

चेन्नई येथील आयआरएस या कंपनीच्या परवानग्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. या कामांना चेन्नई येथील कंपनीकडून अनधिकृत नकाशे मिळण्याची प्रतीक्षा राहिली आहे. ते नकाशे मिळाल्यानंतरच सीआरझेडची मंजुरी मिळणार असल्याने ही कामेही लांबणीवर पडणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button