राजापूर तालुक्यातील वेत्ये तिवरे समुद्रकिनारी आढळली कासवाची ३७५ अंडी.
राजापूर तालुक्यातील वेत्ये तिवरे येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या समुद्र कासवांची सुमारे ३७५ अंडी सापडली आहेत. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांनी सदरची अंडी हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवली आहेत.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सागरी जिल्ह्यांमधील काही किनार्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात.
राजापूर तालुक्यातील वाडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मे हा सागरी कासवांचा विधीचा हंगाम असतो. मात्र यावर्षी काहीशा उशिराने कासव अंडी देण्यासाठी समुद्रकिनारी दाखल झाल्याचे पहायला मिळत आहे.www.konkantoday.com