
प्रदूषणमुक्त भारतसाठी तामिळनाडू ते काश्मीर सायकलस्वारी करणारा अवलिया.
पर्यावरणाचा समतोल राखून भारत देश प्रदूषणमुक्त रहावा, याच्या जनजागृतीसाठी तामिळनाडू राज्यातील नमकल्ला मगनुर, जिल्हा सेल्लम येथील अंबू चार्ल्स हे वयाच्या साठीत चक्क सायकलवरून जनजागृती करीत आहेत. सायकल वापरा रोगमुक्त व्हा असा संदेश देत पाच-दहा किलोमीटर नव्हे तर तब्बल ४ हजार ५०० किलोमीटरच्या तामिळनाडू ते काश्मिर या मोहिमेवर निघाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्या या तरूण मनाच्या अवलियाचे चिपळूण तालुक्यातील सावर्डे व बहादूर शेख नाका येथे शुक्रवारी पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले.
या स्वारतान भारावलेले अंबु चार्ल्स यांनी चिपळूणकरांचे देखील विशेष आभार मानत पुढील प्रवासाच्या दिशेने मार्गस्थ झाले.www.konkantoday.com