
देवरूख शहरातील वरची आळी येथे भरदिवसा घरफोडी
देवरूख शहरातील वरची आळी येथे भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर देवरूख पोलीस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील वरची आळी येथे रस्त्यालगत संजय बांदरकर यांचे घर आहे.
त्यांचा बाजारपेठेत इस्त्रीचा व्यवसाय आहे. बांदरकर हे नेहमीप्रमाणे गुरूवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास इस्त्रीच्या दुकानात होते. तत्पूर्वी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी सुजाता या मुलीला दवाखान्यात घेवून गेल्या होत्या. दुपारी ३.१५ ते सायंकाळी ५ च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला.www.konkantoday.com