
दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडले या रागातून दोन गटात शिवीगाळ व हाणामारी
दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडले या रागातून दोन गटात शिवीगाळ करून हाणामारी केल्याचा प्रकार काल रात्री 8.30 वाजता घडला असून दोन्ही गटांनी दापोली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून संशयितानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केळशी किनारा मोहल्ला येथे उरूस साजरा करण्यासाठी सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडण्यावरून एकाच समाजाच्या दोन गटात वाद झाले त्यातील एका गटामधील जाहिद अब्दुल रज्जाक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इमारतीचे कुलूप तोडल्याचा राग मनात धरून उंबरशेत नबी मोहल्ला येथील ग्रामस्थ जाहिद अब्दुल रज्जाक, आतिका जाहिद डायली तसेच अन्य काही जणांना केळशी किनारा मोहल्ला येथील 15 संशयितानी शिवीगाळ करून मारहाण केली. तर जाकीर इस्माईल होडेकर यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्या गटातील लोकांना शिवीगाळ करून हाणामारी केली म्हणून 35 संशयिता विरोधात तक्रार दाखल केली असून दापोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील सुमारे 50 संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.