जिल्ह्यातील केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लरच्या सेवांच्या दरात २० ते ३० टक्के दरवाढ होणार.
काही दिवसांपूर्वीच खाद्यतेलांच्या दरात वाढ झाल्याने घराघरातील फोडणी महागलेली असतानाच जिल्ह्यातील केशकर्तनालये आणि ब्युटीपार्लरमधील विविध सेवांच्या दरात २० ते ३० टक्के दरवाढ होणार असल्याने अनेक घरांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. राज्याच्या सलून आणि ब्युटीपार्लर संघटनेने १ जानेवारीपासून दरवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनांनीही जिल्ह्यात ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या सभेमध्ये घेतला आहे. पुढील १०-१५ दिवसात या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com