अवैध वाळू उपसा कारवाई अहवाल सादर करा, जिल्हाधिकार्यांचे आदेश.
सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाद्वारे वाळू उपशावर बंदी घातली असतानाही चिपळूणच्या खाडीपट्ट्यातील करंबवणे मालदोली गावात सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे अनधिकृत वाळू उपसाप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी येथील तहसीलदार प्रवीण लोकरे यांना दिले.
चिपळूण तहसिलदारांना ६ जानेवारी रोजी केलेल्या पत्रव्यवहारात जिल्हाधिकार्यांनी नमूद केले आहे की, तुमच्या अखत्यारित असलेल्या करंबवणे, मालदोलीतून अवैधरित्या, बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन सुरू आहे. या विरोधात परिसरातील ग्रामस्थांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या आहेत.www.konkantoday.com