राजापूर तालुक्यात एका मुकबधीर तरुणीवर ३४ वर्षीय तरुणाचा अत्याचार.
राजापूर तालुक्यात एका मुकबधीर तरुणीवर ३४ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, गणेश चंद्रकांत कदम (३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. गुरुवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित मुकबधीर तरुणी आपल्या आई- वडिलांसोबत राहते. गुरुवारी पीडितेचे वडील बाहेर गेले होते. तर दुपारी १२ च्या दरम्यान पीडितेची आई वडिलांना डबा देण्यासाठी घराबाहेर पडली.
यावेळी आरोपीने पीडितेच्या घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यानंतर पीडितेच्या आईने राजापूर पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी गणेश चंद्रकांत कदम याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ २ चे (आय, के) व कलम ३३२ (बी) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली