पारंपरिक मच्छीमारांवर गदा येईल अशी अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
रत्नागिरी, – रत्नागिरी किनारपट्टीवर गत दोन दिवस झालेल्या कार्यवाहीची गंभीर दखल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. संबंधित नौका मालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, कोणत्याही पद्धतीत पारंपरिक मच्छीमारांवर गदा येईल अशा पद्धतीने अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री राणे हे १३ जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहात विविध विभागांची बैठक आयोजित केली असून दरम्यान मत्स्यव्यवसाय / बंदरे या बाबींवर चर्चा होणार आहे. बैठकीस पोलीस विभाग, बंदर विभाग, कस्टम विभाग, भारतीय तटरक्षक दल,मत्स्यव्यवसाय विभाग आदी यंत्रणांचा सहभाग असेल.
दि. ०८/०१/२०२५ रोजी रात्रौ रत्नागिरी गोळप- पावस बंदरा समोर मलपी कर्नाटक येथीलपरप्रांतीय नौका “अधिरा” क्र. IND-KL-०२-MM- ५७२४ मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने ताब्यात घेतली. या गस्ती नौकेवरील मासळी लिलाव, जबाब,पंचनामा इ. प्रक्रिया पार पाडून नौका अवरुद्ध करण्यात आली आहे…या नौकेवरील खलाशांनी अवैध शस्त्रांचा धाक दाखविल्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे दि. १०/०१/२०२५ रोजी कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून,नौकेवरील ७ खलाशी पोलीस विभागकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अंतर्गत १९८१ व (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये दावा दाखल करण्यातआला आहे. दि. १०/०१/२०२५ रोजी कस्टम विभागाने रत्नागिरी किनारपट्टी समोर सुमारे १० ते १२ सागरी मैला दरम्यान नौका क्र. “IND-MH-08-MM- ४०५३” या नौकेवर अनधिकृतपणे LEDलाईट्स व जनरेटर वापरात असलेली त्यांचे गस्ती दरम्यान पकडण्यात आली आहे. ही नौकाआज दि. ११/०१/२०२५ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. हीनौका रत्नागिरी येथील महबूबखान अब्दुलाखान फडनाईक व समीरखान फडनाईक यांनीभाडे तत्वावर चालवावयास घेतल्याची प्राथमिक माहिती कस्टम विभागाने दिली आहे.
ही नौकाआज रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात घेऊन सागरी मासेमारी नियमन अंतर्गत १९८१ व(सुधारणा) अधिनियम २०२१ अंतर्गत नौकेवर दावा दाखल करण्यात येत आहे.