
शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने महिलेकडून उपोषणाचा इशारा.
पतीच्या अपघाती निधनानंतर अनेकवेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने महिलेकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राजश्री आकाराम जाधव (रा. पेठकिल्ला रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येईल, असे या महिलेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनातील माहितीनुसार राजश्री यांचे पती आकाराम नामदेव जाधव यांचे १७ मे २०१९ रोजी अपघातात झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले होते.www.konkantoday.com