दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी प्रवासी व प्रवासी संघटना एकवटल्या.
कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्या विक्रमी गर्दीने धावत असतानाही कोकणवासियांच्या हक्काची पॅसेंजर बंद करून उत्तरप्रदेशातील एक्सप्रेस गाडी चालवण्याचा घाट घालण्यात आला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याऐवजी दादर-गोरखपूर गाडी चालवण्यात येणार आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले असून दादर-गोरखपूर सुरू केल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार, गुजरातच्या दिशेने ये-जा करणार्या प्रवाशांसाठी दादर स्थानक सोयीचे असल्याने आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्याने दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोकणवासियांच्या पसंतीस उतरली होती. पॅसेजर नियमितपणे विक्रमी गर्दीने धावत होती. कोरोनाच्या संकट काळात सप्टेंबर २०२१ पासून गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता नसल्याने अन वक्तशीरपणे कारण देत बंद करण्यात आलेली ही पॅसेंजर आजघडीलाही बंदच आहे. www.konkantoday.com