मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा सदाशिव केळकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा सदाशिव केळकर यांचे बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.विनायक उर्फ दादा केळकर यांनी आपल्या आयुष्यात नामवंत उद्योजक आंबा आणि हॉटेल व्यवसायात मोठी भरारी घेतली. या व्यवसायात त्यांनी त्यांनी आपले नावलौकिक मिळवून मालगुंड आणि नेवरे या ठिकाणी आंब्याच्या मोठ्या फॅक्टरी निर्माण केल्या निर्माण केल्या. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले यावेळी हॉटेल व्यवसायात देखील त्यांनी मोठी यशस्वी वाटचाल केली.

मालगुंड पंचक्रोशीतील एक नामवंत उद्योजक म्हणून त्यांनी आपले नाव कमावताना सामाजिक कार्यात ही आपली विशेष झलक दाखवली.त्यामध्ये त्यांनी मालगुंड ग्रामपंचायतीचे सुमारे पंधरा वर्षे सदस्य म्हणून काम केले. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीमध्ये सुमारे नऊ वर्षे संचालक पदावर काम केले. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. त्यांचे केळकर कुटुंब खूप मोठे आहे.मात्र या कुटुंबात सर्व एकोप्याने आणि एकसंघ राहून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आदर्श इतरांसमोर निर्माण केला.

आजही त्यांची एकत्रित कुटुंब पद्धती इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे. मालगुंड बाजारपेठेमध्ये त्यांचे किराणामालाचे दुकान विशेष प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देखील त्यांनी एक नामवंत व्यवसायिक म्हणून आपली संपूर्ण मालगुंड पंचक्रोशी मध्ये वेगळी ओळख निर्माण करून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button