
मुस्लिम महिलेला ‘खुला’द्वारे घटस्फोटासाठी पतीच्या संमतीची गरज नाही : हायकाेर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुस्लिम महिलेला ‘खुला’ द्वारे घटस्फोट घेण्याचा पूर्ण आणि बिनशर्त अधिकार आहे. यासाठी पतीच्या संमतीची आवश्यकता नाही,” असा महत्त्वपूर्ण निकाल तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.दिला आहे. ‘खुला’ हा मुस्लिम समाजात पत्नीच्या पुढाकाराने होणारा घटस्फोट आहे. विवाहाच्या समाप्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पत्नीला मौलवीं किंवा दार-उल-कझा यांच्याकडून ‘खुलानामा’ (घटस्फोटाचे प्रमाणपत्र) घेण्याची आवश्यकता नाही, कारण मौलवींचे मत केवळ सल्लागार स्वरूपाचे असते, असेही न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती बी.आर. मधुसूदन राव यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.बार अँड बेंच’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुस्लिम महिलेने खुलाची केलेली मागणी पतीने नाकारली. यानंतर पत्नीने वैवाहिक वादावर ताेडगा काढणार्या ‘सदा-ए-हक शरई कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडे धाव घेतली होती. २०२० मध्ये ‘सदा-ए-हक शरई कौन्सिल’ने ‘खुला’ द्वारे घटस्फोट घेतला होता. पतीने याला आव्हान देत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. खुलासाठी संमती दिली नव्हती, असा दावा त्याने या याचिकेतून केला होता. कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली. यानंतर पतीने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.