
सिंधुदुर्गात जाणाऱया चाकरमान्यांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अपघात १३ जण जखमी
नालासोपाऱ्याहून सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीला मुंबई गोवा हायवेवर चिपळूण जवळील कळंबस्ते येथेअपघात झाला या अपघातात गाडीतील तेरा जण जखमी झाले जखमींची नावे राजेश संजय शेटे ,अंकिता शेटे, पूजा हलपते, विशाल शिगवण, अंकिता शिर्के, योगेश पवार, काव्या चव्हाण , विद्या चव्हाण ,आरती चव्हाण ,संदीप चव्हाण, सचिन पवार ,महेश कडू, रोशन चव्हाण हे सर्वजण मुंबई नालासोपारा येथील राहणारे आहेत ते टेम्पो ट्रॅव्हल्स घेऊन नालासोपारा ते खारेपाटण जात असतांना अपघात झाला कळंबस्ते येथे पावसामुळे रस्ता ओला झाल्याने चालकाने ब्रेक मारल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन घसरली याबाबत टेम्पोचालक रोशन चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com