राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापू शेट्ये यांचा शिंदेसेनेत प्रवेश आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर केला जाहीर प्रवेश
संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याचे प्रसिद्ध उद्योगपती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे साखरपा तसेच जिल्ह्यातील बडे नेते संदेश उर्फ बापू शेट्ये यांनी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. बापू शेट्ये यांच्या रूपाने भैया सामंत यांना एक प्रकारे प्रवेश करून वाढदिवसाची गिफ्ट दिली. शेट्ये यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असून शिंदे सेनेची ताकद वाढली आहे. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने शेट्ये् यांच्या प्रवेशाला महत्व प्राप्त होऊ लागले आहे. राष्ट्रवादीने बापू शेट्ये यांना अनेक पदे दिली आहे. त्याबद्दल शरद पवार व अजित पवार यांनात्यांनी धन्यवाद दिले . यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करणारे आणि यशाला गवसणी घालणारे शेट्ये यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांचबरोबर देवडे खैरवाडीतील दत्ताराम वीर व गणपत माईल यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी साखरपा कोंडगाव देवडे येथील महिला शाखा प्रमुख संध्या गांगण शाखा प्रमुख सुरेश साबळे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.