
निवडणुका आटोपल्यानंतर सदोष घरगुती मीटरच्या जागी स्मार्ट मीटर.
लोकांचा मोठा विरोध असल्याचे पाहून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित केलेला स्मार्ट प्रिपेर मीटर बसवण्याचा निर्णय आता कार्यवाहीत आणण्यात येत आहे. घरगुती ग्राहकांचे वीज मीटर बदलायचे असतील स्मार्ट प्रिपेड मीटर देण्यात येत आहेत. सदोष मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे धोरण महावितरणने स्पष्ट केले आहे.१ जानेवारीला या संदर्भात महावितरणचा निर्णय जारी करण्यात आला. मीटर बदलण्याचे काम तातडीने सुरू करावे, असे कर्मचार्यांना सुचविण्यात आले आहे. गतवर्षी चार कंपन्यांना मीटर बदलण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
या कंपन्यांनी मीटर बदलण्याची तयारी चालू केली परंतु ग्राहकवर्गातून तीव्र आक्षेप घेण्यात आला. सुरू असलेले मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यामागे कोणाचे भले होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.यानंतर शासकीय कार्यालये, तसेच वसाहतीमधील रोहित्रे त्याचप्रमाणे उपकेंद्रांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
आता हे मीटर घरगुती ग्राहकांना देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी सदोष मीटर शोधून तेथे हे मीटर बसविण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे थेट विरोध होण्याची शक्यता कमी असल्याचा आडाखा बांधण्यात आला आहे.www.konkantoday.com