
उध्दव ठाकरेंनी पाठवले आ. साळवी यांना पत्र; शिवसेना निष्ठेचे केले कौतुक
राजापूर : पक्षनिष्ठा दाखविणारे शिवसेनेचे उपनेते, आमदार राजन साळवी यांच्या निष्ठेची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आमदार साळवी यांना पत्र पाठवून कौतुकाची थाप मारली
आहे.
गेले काही महिने शिवसेनेत एक जबरदस्त वादळ सुरु असून त्यातून मोठी राजकीय पडझड झाली आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार त्यातून पायउतार झाले. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षादरम्यान पक्षासमवेत राहिलेल्या आमदारांना आमिषे दाखविली गेल्याचे आरोप राजकीय वर्तुळात पाहायला मिळाले. या सर्व घडामोडी घडत असताना राजापूरचे सेना आमदार राजन साळवी यांनी पक्षनिष्ठेसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाशी एकनिष्ठा दाखविली होती. त्याची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली व त्यांना उपनेतेपदी बढती दिली गेली. शिवसेना पक्षप्रमुखांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिले
आहे.