
रत्नागिरीतील दोन्ही उंच पुतळे सुरक्षित असल्याचा नगरपरिषदेचा दावा.
नुकत्याच मालवण येथे घडलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेनंतर आता रत्नागिरीतही सर्व उंच आणि विशाल पुतळ्यांचे परीक्षण करण्यात आले. शहरातील दोन्ही उंच पुतळे हे शासकीय विभागाकडून अत्यंत काळजीपूर्वक बांधण्यात आले असून या पुतळ्याचे संबंधित विभागाकडून वेळोवेळी सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे नुकत्याच करण्यात आलेल्या परीक्षणानुसार शहरातील सर्वच पुतळे मजबुत आणि सक्षम असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. www.konkantoday.com