
गटशिक्षणाधिकारी हजर न झाल्यास शिक्षण विभागाला टाळे ठोकणार -शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे
पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी मिळत नसल्याने चिपळूण पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या वादाच्या भोवर्यात सापडला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या थकलेल्या पगाराचा विषय ताजा असतानाच प्रभारी पदामुळे शिक्षण विभागातील अन्य कामकाजावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने चिपळूण तालुक्याला तत्काळ कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी दिला नाी तर पं. स. च्या शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याने अधिकार्यांची भंबेरी उडाली आहे.
konkantoday.com