राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेकडून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना मानाचे स्थान.
वाशिष्ठी मिल्क प्रकल्प आयोजित कृषि महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी चिपळूण दौर्यावर आलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांना बोलावून गाडीतून एकत्र प्रवास केला. तसेच मंचावर शेजारी बसविले. दोघांमध्ये बराचवेळ संवाद झाला. खा. पवार यांनी दिलेल्या प्रेमामुळे आ. जाधव भारावून गेला.खा. शरद पवार यांचे हेलिकॉप्टर शहरातील पवन तलाव मैदानात उतरल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. भास्करराव जाधव देखील खा. पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
स्वागतानंतर आ. जाधव आपल्या गाडीकडे रवाना झाले. यावेळी खा. शरद पवार यांनी आ. जाधव यांना बोलावून आपल्या गाडीत घेतले. खा. शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि आ. भास्कर जाधव तिघे गाडीतून वाशिष्ठी प्रकल्पाकडे रवाना झाले. तेथून ते कृषि महोत्सव कार्यक्रमस्थळी रवाना झाले. आ. जाधव आणि खा. पवार यांच्यात बराच वेळ संवाद झाला. कार्यक्रमस्थळी देखील खा. पवार यांनी मंचावर आ. जाधव यांना आपल्या शेजारी बसविले.www.konkantoday.com