
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच ब्रांझचा पुतळा उभारणार.
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच, संपूर्णपणे ब्रॉंन्झचा पुतळा येत्या सहा महिन्यात उभारला जाणार आहे. या पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे इतके असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी नौदल दिनानिमित्त राजकोट येथे यापूर्वी उभारण्यात आलेल्या पुतळ्याची सर्व प्रक्रिया नौदल विभागाकडूनच करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाकडून केवळ त्यांच्या मागणीप्रमाणे २ कोटी ४४ लाख रुपये त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे त्या पुतळ्याशी सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंध नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.www.konkantoday.com