
कपूर यांच्या आरके स्टुडिओचे नवे मालक गोदरेज समूह
हिंदी सिनेसृष्टीतील एक मानबिंदू असलेला कपूर परिवाराचा चेंबूर येथील आरके स्टुडिओ अखेर विकला गेला आहे. गोदरेज समूहाच्या गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने हा स्टुडिओ खरेदी केला असून या डीलचा तपशील मात्र उघड करण्यात आलेला नाही.