क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी 5 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

रत्नागिरी, दि. 7 :- सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बोर्ड अंतर्गत असलेल्या शाळेतील इयत्ता दहावी व बारावी मधील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी प्रस्ताव शालेय स्तरावरून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे विहित नमुन्यातीव प्रपत्र, आवश्यक माहिती, कागदपत्रानुसार सादर करावयाचे आहे. जिल्ह्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलत गुणांचे परिपूर्ण प्रस्ताव (प्रत्येक खेळाडूसाठी स्वतंत्र प्रस्ताव) तयार करून दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे 5 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे प्र.जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुणांचे प्रस्ताव सादर करणे बाबतचे कव्हरींग पत्र, शासकीय / संघटनेच्या जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी खेळाडू विद्यार्थ्यांची यादी, ग्रेस मार्क मिळणेसाठी करावयाचा अर्जाचा विहित नमुना-शासकीय स्पर्धा, ग्रेस मार्क मिळणेसाठी करावयाचा अर्जाचा विहित नमुना-मान्यताप्राप्त एकविध खेळ संघटना स्पर्धा, खेळाडू विद्यार्थ्याचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्राची साक्षांकित झेरॉक्स प्रत, खेळाडू विद्यार्थी हॉल तिकीट झेरॉक्स प्रत (टिप-बैठक क्रमांक चुकल्यास संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय जबाबदार राहील), जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे क्रीडा सवलतीचे गुण बाबतचे शिफारस प्रमाणपत्र.

(फॉर्म नं. 1 ते 9 ची माहिती शाळेने भरावयाची आहे) (उर्वरीत माहिती कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहे), विभागीय मंडळाकडे छाननी शुल्क भरणा केलेल्या चलनाची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. क्रीडा सवलत गुण मिळण्यासाठी पात्र खेळ पुढीलप्रमाणे आहेत.

धर्नुविद्या, बॅडमिंटन, बास्केटबॉल, सायकलिंग, फुटबॉल, हँडबॉल, ज्युदो, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, कबड्डी, बेसबॉल, वुशु, सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ, थ्रोबॉल, योगासन, डॉजबॉल, टेनिक्वाईट, अॅथलेटीक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, हॉकी, व्हॉलीबॉल, रायफल शुटिंग, कुस्ती, सॉफ्टबॉल, नेटबॉल, स्क्वॅश, नेहरू कप हॉकी, रग्बी, मॉडर्न पेंटेथलॉन, खो-खो, कॅरम, क्रिकेट, रोलर स्केटिंग/ हॉकी, रोल बॉल, शुटींग बॉल, आट्यापाट्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button