विकासासाठी घाबरायची गरज नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदार झालाय:- आमदार किरण सामंत

राजापूर तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश करत असून आज राजापूर तालुक्यातील भू – पंचक्रोशितील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी पक्ष प्रवेशाचे औचित्य साधून आमदार किरण सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, आज तालुका भगवा मय होतोय जनतेने येणारी वेळ ओळखली आहे त्यामुळे अनेक मान्यवर आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून पक्ष प्रवेश केले जात आहेत.येणाऱ्या पंचायत समतीती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कोदवली जिल्हा परिषद गट भगवेमय करणार असल्याचे प्रतिादन आमदार किरण सामंत यांनी केले.प्रत्येक गावात विकास गंगाआणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार करू या.गाव तिथे शाखा हा मतदार संघात उपक्रम राबवणार असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. विकासासाठी घाबरायची गरज नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदार झालाय हे सांगायला ही ते विसरले नाही.

यावेळी जिल्हाप्रमख राहुल पंडित, संघटक प्रकाश कुलेकर, तालुका प्रमुख दीपक नागले, सुनील गुरव, राजु कुवळेकर, मानसी तीरलोटकर, अमोल नार्वेकर, रामचंद्र रांबाडे, विश्वास दळवी, ऋतिक दर्वे, प्रसाद भोसले प्रकाश दिवाळे यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

पेडखलेचे माजी सरपंच राजेश गुरव, उबाटाचे शाखाप्रमुख जगदीश मटकर ,दशरथ कदम, भास्कर खानविलकर ,वासुदेव डुकळे, संजय लाखन ,विजय मांडवकर विलास महादेव ,संतोष निजावे, खिंडळीचे माजी सरपंच मानसी कदम, भू ग्रुप विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे मनोज कदम ,राजेश गुरव, चंद्रकांत जानकर, धनाजी तांबे, रमेश सरफरे ,गोविंद राऊत, विजया जोगळे महेश पुराणिक सरिता भिंगे, सुमित म्हात्रे, बबन म्हात्रे ,संतोष महादेव, रमेश सरफरे, श्रीकृष्ण सरफरे, देवी असुर चे माजी सरपंच आणि शाखाप्रमुख राजाराम भुवड, गावकर प्रशांत भुवड ,दर्शन विचारे, वाडा पेठचे राजू जाधव संजय मुळे अमित कुंभार सदानंद जाधव महादेव मोगरकर यांच्या सहित शेकडो ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button