
रत्नागिरी कोस्टल मॅराथॉनमध्ये आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक करीम नाकाडे सलग दुसर्यावर्षीही सहभागी
रत्नागिरी : मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनमध्ये फ्रेंण्ड्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशन यांच्या मदतीने रत्नागिरीतील दिव्यांग दरवर्षी सहभाग घेऊन मॅराथॉन पुर्ण करतात.तेथिल दहावर्षाचा अनुभव घेवुन आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडे यांनी रत्नागिरी कोस्टल मॅराथॉनमधे सलग दुसर्यावर्षी सहभाग नोंदविला.याआधी रत्नागीरी फीट मॅराथॉनमधेही ते 5 किलोमीटर व्हीलचेअरवरुन धावले होते.यावर्षी 10 किलोमीटरमधे नॉर्मल कटॅगरीमधुन धावले.
कोकणात अॅक्सीडंट होवुन स्पायनल कॉर्ड इंज्युरीमुळे म्हणजे पाठीच्या मणक्याला मार लागुन पाठीपासुन खालील भागाच्या संपुर्ण संवेदना गमावलेले पॅराप्लेजिक दिव्यांग खुप आहेत.अपंगत्वामुळे शारीरीक व मानसिक संतुलन गमावलेले, आत्मविश्वास कमी होवुन खचलेल्या दिव्यांगांना मोटीव्हेट करण्यासाठी सादिक नाकाडे सतत वेगवेगळ्या पध्दतीने कार्यरत असतात.नॉर्मल लोकांप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा दिव्यांगांनी फिजीकली फिट रहाणे खुप गरजेचे असते.त्यासाठी अहारावर कंट्रोल असणे आणी दररोज व्यायाम करणे खुप आवश्यक आहे यागोष्टीचा अवेअरनेस दिव्यांगांमधे जागविणेसाठीच सादीक नाकाडेंनी हॅण्डीकॅप कॅटॅगरी नसतानाही सुदृढ लोकांमधेच सहभागी होवुन व्हीलचेअरवरुन धावुन मॅराथॉन पुर्ण केली. सादीक नाकाडेंना चिअरअप करणेसाठी त्यांचे बंधु श्री समीर नाकाडे आणी भाचा महोम्मद नाकाडे,भाची शबनम नाकाडेही संपुर्ण मॅराथॉन धावले. सर्वजण पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते.
सादीक नाकाडेंना व्हीलचेअरवरुन धावताना पाहुन ईतर स्पर्धकही खुप उत्साहाने आनंदाने धावतात आणी मॅराथॉन पुर्ण करतात. या मॅरेथॉनमधून सादीक नाकाडेंचा उत्साह पाहून सुदृढ लोकही खूप आकर्षित होतात. दिव्यांगाच्या चेहर्यावरुन वाहणारा आनंद, उत्साह पाहून ते सुद्धा अचंबित होतात.यामुळे त्यांच्यातील उमेद, आत्मविश्वासही वाढतो.
पुढीलवर्षी रत्नागीरी कोस्टल मॅराथॉनमधे जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभाग घेऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करावी असे अवाहन श्री सादिक नाकाडेंनी केले आहे.