
दापोली तालुक्यातील मुरूड किनार्यावरील स्वच्छतागृह धोकादायक स्थितीत
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनार्यावरील स्वच्छतागृह गेले दहा ते अकरा वर्षे धोकादायक स्थितीत आहे. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम प्रशासन, स्थानिक प्रशासन काहीच पावले उचलत नसल्याने पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
मुरुड समुद्रकिनार्यावरील स्वच्छतागृहाची बांधकाम विभागाने उभारणी केल्यानंतर उदघाटनापूर्वीच स्वच्छतागृह धोकादायक बनले. त्यामुळे यासाठी खर्च केलेला निधी वाया गेला. त्यानंतर गेली अनेक वर्षे धोकादायक स्थितीत असलेले हे स्वच्छतागृह आता समुद्रकिनार्यावर येणार्या पर्यटकांसाठी धोकादायक बनले आहे.
दोन वर्षांपूर्वी एका चेंजिंग रुमचे बांधकाम समुद्राच्या वेगवान लाटांमुळे जमीनदोस्त झाले. परंतु स्वच्छतागृहाचे बांधकाम मात्र अजूनही पडझडीच्या अवस्थेत उभे आहे. स्वच्छतागृहाच्या धोकादायक अवस्थेची कल्पना देऊनही अनेक पर्यटक या परिसरात फिरत असतात. काहीजण स्वच्छतागृहाच्या पायर्यांवर बसताना दिसतात.
हे बांधकाम शुभारंभाआधीच धोकादायक झाल्याने ते ग्रामपंचायतीकडेही वर्ग झालेले नाही. शिवाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून देखील ते अद्याप जमीनदोस्त करण्यात आलेले नाही. तसेच या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये असे फलक लावलेले नाहीत किंवा संरक्षणार्थ काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम प्रशासन, स्थानिक प्रशासन काहीच पावले उचलत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




