
कामचुकार अधिकार्यांवर कारवाई करा, खासदार सुनिल तटकरे
जिल्ह्यात केंद्र आणि राज्याच्या पीक विमा योजनेत कंपन्यांची फसवेगिरी जलजीवन मिशन आदी योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आणि असमाधानकारक काम समोर आले आहे. अनेक अधिकारी योजनांच्या अंमलबजावणीत कामचुकारपणा करत आहे. अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी. त्या कारवाईचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, अशा सूचना जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार राणे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी पार पडली. बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलगर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होतेwww.konkantoday.com