
“ओझरे” जिल्हा परिषद गटातील उ.बा.ठा शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश..
संगमेश्वर : तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटात उ.बा.ठा. शिवसेना गटातील शिवसैनिकांनी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुका अध्यक्ष श्री रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत तालुका उपाध्यक्ष श्री विजय (बाबु गुरव) यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. भाजपा नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करायला इच्छुक असल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी ताकद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत आहे.
झालेल्या पक्षप्रवेशामध्ये प्रवेश कर्ते संतोष सनगले., सिताराम सनगले, लक्षक सनगले, हर्षद सनगले, वंदना सनगले, श्रॄती सनगले, संस्कार घडशी .व तेजस घोगरे आदींनी भाजप प्रवेश केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रश्मी ताई कदम, महीला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ.वर्षा ढेकणे , सरचिटणीस अमित केतकर हातिव गावचे सरपंच नंदकुमार कदम, वाशी गावच्या सरपंच सौ. तन्वी गानु युवा तालुका उपाध्यक्ष अक्षय शिंदे व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.