कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया-उदय सामंत

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज ‘वर्क फ्रॉम होम’ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे.
हे ऑनलाईन कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात
तंत्रशिक्षण विभागाचे संचालक,डॉ.अभय वाघ हे व्हॉट्सअँप समूहावर मार्गदर्शन करीत आहेत.
प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने माहिती पुरविणे तसेच पाठ्यक्रमानुसार व्हिडिओ तयार करून ते इमेल,व्हॅट्सअप द्वारे उपलब्ध करून देणे, याच बरोबर ऑनलाइन संसाधनांचा (SWAYAM, NEAT, COURSERA , edX etc ) अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वापर करणे , Screen -o-matic सारख्या ऑनलाईन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषय निहाय व्हिडीओ क्लीप तयार करून विद्यार्थ्यांना पुरविणे , व्हॉट्सअप समूहाद्वारे नेमवून दिलेले कार्य (Assignment) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसरण करणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नावलीची बँक तयार करणे,असे अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले आहे.
पुढील टप्प्यात सर्व संस्थांचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. सर्व संस्था व प्राध्यापक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना वरीलपैकी कोणकोणते पर्याय वापरले , त्यांची परिणामकारकता काय , किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला याबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे प्राचार्य यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील प्राध्यापक पदांना ७ वा वेतन आयोग लागू करताना शासनाने प्राध्यापकांची कामगिरी तपासण्यासाठी ३६० डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. यात प्राध्यापक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि ‘३६० डिग्री फीडबॅक’ या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ अंतर्गत केलेल्या कार्याचा मूल्यमापनाच्या दृष्टीने समावेश असेल अशा पद्धतीने आधुनिक तंत्रावर आधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून या लॉक डाउन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे महत्वपूर्ण कार्यालयीन कामकाज विशेषतः मार्च अखेरची आर्थिक बाबींविषयक कामे सुद्धा दूरध्वनी, इमेल, व्हॉट्सअप च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत.असेही श्री. सामंत यांनी संगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button