
साळवी स्टॉप ते कुवारबाव बेकायदेशीर बांधकामांनाभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ नोटिसा देत बसले आहे ,सरकारी जागेत बेकायदेशीर बांधकाम करणार्याना नोटिसांची काय गरज
साळवी स्टॉप ते कुवारबाव बेकायदेशीर बांधकामांना
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ नोटिसा देत बसले आहे
रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या-नागपूर महामार्गावर साळवी स्टॉप तेटीआरपी या दरम्यान रस्त्याच्या बाजुला केलेल्या अनधिकृत
बांधकामांचे व्हिडिओ, फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत. ती
हटविण्याची सात दिवसाची पहिली नोटीस दिली आहे.
संबंधितांना पुढच्या आठवड्यात वकिलामार्फत दुसरी नोटीस
देऊ. स्वतंत्र यंत्रणेद्वारे ही बांधकामे हटविण्यात येतील, अशीमाहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयातील अधिकार्यांनी दिली.आहे मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी भूसंपादन आणि मोबदला वाटप प्रक्रिया सुरूआहे. त्यानंतरच सरकारी जागेत हीबांधकामे गेल्या दीड महिन्यांत रातोरात उभी राहिली आहेत ही बांधकामे उभी राहताना या विभागाने कोणतीही कारवाई केली नाही आता त्यांना नोटिसा देण्यात येत आहेत नोटिसांची मुदत टळून ही हा विभाग काहीही कारवाई करत नाही सरकारी जागेत बेकायदेशीर बांधकामे उभारण्याला नोटिसांची गरज नसून ही बांधकामे अनधिकृत म्हणून काढता येऊ शकतात परंतु हा विभाग नोटिसा देत वेळकाढू धोरण राबवत आहे तसेच या खात्याने अशाप्रकारे बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या बांधकामांना कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही हे प्रथम जाहीर करणे आवश्यक आहे रुंदीकरणासाठी शासनाकडून नुकसानभरपाई लाटण्याचा दृष्टीनेही बांधकामे उभी राहतआहेत तसेच त्यांना ग्रामपंचायती कशी काय पावती देऊ शकते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे तसेच काहीबांधकामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठाही देण्यात आला तो कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला ही माहितीही जाहीर होणे आवश्यक आहे याबेकायदेशीर बांधकामांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील नाराजी व्यक्त करुन अशाप्रकारे बांधकामे करणाऱ्यांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे जाहीर केले असले तरी संबंधित खात्याने स्वत हून हे जाहीर करणे आवश्यक आहे
www.konkantoday.com