
आडवली रेल्वे स्थानकांनजीक ओव्हरहेड विद्युत वाहिनीत (OHE) बिघाड निर्माण झाल्याने अनेक गाड्या खोळंबल्या, दोन तासांनी वाहतूक सुरू
कोंकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकांनजीक ओव्हरहेड विद्युत वाहिनीत (OHE) बिघाड निर्माण झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणारी दैनंदिन एक्सप्रेस गाडी आडवली रेल्वे स्थानकाच्या खाली असता विद्युत वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने या गाडीसह याचवेळी भागातून जाणाऱ्या गाड्या रोखून ठेवाव्या लागल्या.
दोन तासानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली, कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणारी एक्सप्रेस गाडी या घटनेमुळे थांबवून ठेवावी लागली. विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यानंतर रत्नागिरी येथून तातडीने रेल्वेची आपत्कालीन व्हॅन घटनास्थळी रवाना झाली. आज (शनिवार) दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.
या घटनेमुळे सावंतवाडी दिवा एक्सप्रेस मधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. याशिवाय मांडवी तेजस व अन्य गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला दोन तासानंतर ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे