
सावंतवाडी तालुक्यातील वेत्येमल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार -पालकमंत्री उदय सामंत
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे एक सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असून, त्या जागेत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी खा. विनायक राऊत यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणीनंतर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आता सावंतवाडी तालुक्यातच होणार हे निश्चित झाले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, गितेश राऊत, रूची राऊत, वेत्ये सरपंच नेहा मिठबावकर,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, सुनील गावडे, गुणाजी गावडे, नरेश मिठबावकर, माजी सभापती रमेश गावकर, राजन पवार हिमांशू परब उपस्थित होते.
www.konkantoday.com